महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टल
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टल: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (MJPSKY) ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना आहे. शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलेली सर्व कर्जे माफ करून त्यांना मदत देण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पोर्टल मध्ये लॉगिन करण्यासाठी इथे क्लिक करा.
सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती
- आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
- मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
- या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
- शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
- पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
- कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.
यांना लाभ मिळणार नाही
- आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
- केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
- महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
- सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
- २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
- शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : Online Digital Seva.
(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)
संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४) <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )
Jalgaon (Maharashtra)
Call/Whatsapp Number: 9665735024.
Comments
Post a Comment