घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृ त घरेलू कामगारांना सन्मानधन योजना
घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मानधन योजना
नमस्कार मी विशाल ..!!
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन देण्यात येणार आहे. हि रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्व्यारे थेट जमा करण्याचा शिंदे सरकारने म्हणजेच शासनाने घेतला आहे. या रकमेमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला हातभार लागेल.
ही योजना राबवुन महाराष्ट्र सरकार हे घरेलू कामगारांचे आर्थिक समस्या सोडवण्याचे प्रयत्न करीत आहे. या योजनेमुळे घरेलू कामगारांचे जीवनमान उंचावण्यात मदत होईल कारण हे घरेलू कामगार अत्यंत अल्प दरात आपली सेवा देतात. हि योजना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राबवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे आभार.
या योजनेतून महाराष्ट्रातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना १०,०००/- रुपये देण्यात येणार आहेत.
घरेलू कामगार सन्मानधन योजनेसाठी कोण पात्र असेल?
- दिनांक ३१.१२.२०२२ रोजी वयाची ५५ वर्षे झालेले नोंदित घरेलू कामगार.
- मागील सलग २ वर्षे जीवित नोंदणी असलेले पात्र घरेलू कामगार.
- घरेलू कामगाराची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.
घरेलू कामगार होण्यासाठी पात्रता काय आहे?
- सदर व्यक्तीचे वय हे १८ वर्षे पूर्ण झालेले असावेत.
- सदर व्यक्तीचे वय हे ६० वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे.
- सदर व्यक्तीकडे घरेलू कामगाराचा वयाचा दाखला असला पाहिजे.
- सदर व्यक्तीकडे रहिवाशी दाखल असणे आवश्यक आहे.
लाभार्थी म्हणून कोणती कागदपत्रे असावीत?
- वयाचा आणि रहिवाशी दाखला असणे आवश्यक आहे.
- ३ पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या प्रती.
- रोखीने किंवा पोस्टल ऑर्डरने ३०/- रुपये इतके शुल्क भरण्यात यावे.
- सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शासनाचा निर्णय पाहण्या साठी इथे क्लिक करा
Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा :
Online Digital Seva.
(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)
संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४) <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )
Jalgaon (Maharashtra)
Call/Whatsapp Number: 9665735024.
Comments
Post a Comment