संगणकाची वैशिष्ट्ये | Characteristics Of Computer in Marathi

संगणकाची वैशिष्ट्ये | Characteristics Of Computer in Marathi संगणकाची वैशिष्ट्ये (Characteristics Of Computer in Marathi) आज संगणकाचा उपयोग अनेक क्षेत्रात होत आहे. आज असे एकही क्षेत्र नाही जिथे संगणकाचा उपयोग नाही, शैक्षणिक क्षेत्र असो कि आर्थिक क्षेत्र प्रत्येक ठिकाणी संगणकाचा उपयोग केला जात आहे. कारण संगणकाची स्वतः ची अशी काही महत्वाची पण खास वैशिष्ट्ये आहेत, ती खालील प्रमाणे :- 1) गती (Speed) गती हे संगणकाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. गतीमुळेच संगणकाचा आधुनिक काळात विकास झाला आहे. मानव जे काम १ महिन्यात पूर्ण करेल तेच काम संगणक काही सेकंदात पूर्ण करतो म्हणजेच मानवाच्या काम करण्याचा वेगापेक्षा संगणकाचा काम करण्याचा वेग कितीतरी पटीने जास्त आहे. ह्यावरून संगणकाच्या गतीची आपल्याला कल्पना येऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, मानवाला जर आकडेमोड करायचे असतील तर मानवाला भरपूर प्रमाणात वेळ लागतो आणि अचूकता पण कमी राहते परंतु हेच काम जर संगणकावर केले तर काही सेकंदात प...