URL म्हणजे काय ? | What is URL in Marathi

 URL म्हणजे काय ? | What is URL in Marathi


URL म्हणजे काय ? | What is  URL in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही  URL हा शब्द कधी वाचला किंवा ऐकला असेल तसेच तुम्ही कधी असे सुध्दा ऐकले असेल कि  URL Download करा. किंवा  URL Open करा. परंतु कित्येक लोकांना माहिती नाही  URL म्हणजे काय ?  URL चा Full Form आणि अर्थ काय आहे. आजचे युग डिजिटल आहे आणि या डिजिटल युगामध्ये भरपूर प्रमाणात इंटरनेट चा वापर होत आहे. इंटरनेटचा वापर करत असतांना आपण  URL च्या मागची कहाणी काय आहे ? हे माहित नसेल चला तर आपण या पोस्ट मध्ये आपल्याला कळेल कि  URL खरोखर काय आहे आणी याचे महत्व किती आहे. एक वेबपेज साठी  URL काय करतो आणि  URL कसे काम करतो.

URL चे पूर्ण नाव म्हणजेच Full Form युनिफार्म रिसोर्स लोकेटर (Uniform Resource Locator) असे आहे. याचा वापर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एका सिंगल वेब पेजला शोधण्याकरिता, त्याला नाव देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सोपी आणि सर्वसाधारण भाषामध्ये सांगायचे झाल्यास कोणत्याही वेबसाईटचा किंवा कोणत्याही एका सिंगल वेब पेजचा Web Address असतो. त्यामुळे आपण त्याच सिंगल वेबपेज साईटवर जाऊ शकतो. URL हा बिल्कुल आपल्या घराच्या पत्त्या सारखा काम करतो. ज्या प्रमाणे घराच्या पत्त्यावर पिन कोड आणि आपल्या घराचा पूर्ण पत्ता असतो ज्यामुळे हा पत्ता जर आपण दुसऱ्याला दिला तर तो आपल्याच घरी येईल. याच प्रमाणे जर URL कोणत्याही व्यक्तीला जर दिला तर तो त्याच सिंगल वेबपेज वर पोहचू शकतो.अश्या प्रकारे काम करतो यूआरएल (URL)
सुरुवातीला Web Address नसून त्या ऐवजी आईपी एड्रेस (IP Address) चा वापर केला जात असे. IP Address चे पूर्ण नाव इंटरनेट प्रोटोकॉल एड्रेस असे आहे. आजच्या काळात IP Address शिवाय संगणकाला इंटरनेट सोबत किंवा कोणत्याही नेटवर्क सोबत जोडल्या जाऊ शकत नाही. आता तुम्हाला हे समजले असेल कि प्रत्येक वेबसाईटचा एक IP Address असतो ज्यामुळे त्याला इंटरनेटवर ओळखल्या जाते.

 IP Address म्हणजे काय ? किंवा IP Address कशाला म्हणतात.

मित्रांनो IP Address लक्षात ठेवणे सोपी नाही हे तुम्हाला खालील उदाहरणावरून लक्षात येईल. मी तुम्हाला सांगितले कि google.in चा IP Address लक्षात ठेवा जो हा आहे 292.147.0.01 नक्कीच तुम्हाला google.in हे लक्षात ठेवणे सोपे जाईल त्या जागेवर 292.147.0.01 हे लक्षात ठेवणे कठीण आहे.
तुम्हाला माझी वेबसाईट लक्षात ठेवणे सोपे जाईल. उदा. https://www.odspays.co

इंटरनेट प्रोटोकॉल 

तुम्हाला वर सर्वात पहिले https दिसत असेल खरतर हे https एक इंटरनेट प्रोटोकॉल आहे. प्रत्येक वेबसाईटच्या URL साठी इंटेरवर  काही नियम बनवलेले आहे या नियमाला इंटरनेट प्रोटोकॉल असे म्हटल्या जाते आणि प्रत्येक URL या नियमाला फॉलो करतो. हे दोन प्रकारचे आहे. पहिला http आणि दुसरा https आहे. http चा फुल फॉर्म Hypertext Transfer Protocol आहे तर https चा फुल फॉर्म Hypertext Transfer Protocol Secure आहे. जर तुम्हाला कोणत्यातरी वेबसाईटवर https आणि कुलूपच्या आकाराचे Icon हिरव्या पट्टी सोबत दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे कि हि साईट SSL मानकांची पूर्तता करतो आणि हि सुरक्षीत आहे.

इंटरनेट चे जनक टीम बर्नर्स ली ने अतुल्य योगदान

 टीम बर्नर्स ली हे तेच महान व्यक्ती आहे.ज्यांनी इंटरनेटच्या माध्यमाने संपूर्ण जगाला जोडले यांनी १९९१ साली पहिला वेब ब्राउजर तयार केला होता. यांनी त्यांचे नाव वर्ल्ड वाइड वेब असे ठेवले होते. आज आपण जे www टाइप करतो हाच शॉटफॉर्म त्यांनी URL ला दिला ज्यामुळे सर्व वेबपेज लवकरात लवकर आणि सहज शोधता येतात.

गुगल सुध्दा URL च शोधतो.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

(SSC Selection Posts Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती

प्रधानमंत्री जन धन योजना सविस्तर माहिती,कागदपत्रे,फायदे,पात्रता,अर्ज प्रक्रिया