Posts

Showing posts with the label PMGDISHA

प्रधान मंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान

Image
     भारताला डिजिटली सक्षम समाज बनविणे आणि देशाला ज्ञान अर्थव्यवस्थेत बदलणे ह्या महत्वाकांक्षी उद्देशाने सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरु केला आहे. ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे नागरिकांना विविध इगवरनेन्स प्रकल्पांशी जोडणे, निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करुन घेणे, ज्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढेल आणि शासनाला जबाबदारीने काम करावे लागेल. डिजिटल भारत कार्यक्रमाचे यश तेव्हाच दिसेल जेव्हा प्रत्येक नागरिकाला डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता आणि संधी मिळेल, मग ते भारतात कुठेही असो आणि त्यांची सामाजिक परिस्थिती कशीही असो. ह्या सर्व उपक्रमांच्या यशासाठी ग्रामीण क्षेत्रासहित संपूर्ण भारतभर डिजिटल साक्षरता असणे महत्वाचे आहे.  उद्देश       ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे विविध केंद्र शासित प्रदेश व राज्यात ग्रामीण भागातील सहा कोटी नागरिकांना, एका कुटुंबातील एक व्यक्ति अशा पद्धतीने, ४० टक्के ग्रामीण कुटुंबांना, डिजिटली साक्षर करणे. ग्रामीण भागातील लोकांना संगणक किंवा डिजिटल उपकरणे (टॅब्लेट स्मार्ट फोन) कसे वापरावे, इमेल पाठवणे आणि वाचणे, इंटरनेट...