प्रधानमंत्री जन धन योजना


प्रधानमंत्री जन धन योजना किंवा पीएमजेडीवाय


व्यक्ती कोणतीही बँक शाखा किंवा बँक मित्रा म्हणून ओळखल्या जाणार्‍या संबंधित बँकेत खाते उघडू शकतात. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत व्यक्ती शून्य समतोल खाते उघडू शकतात.

    प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ग्राहक सरकारी बँकांप्रमाणेच, खासगी बँकांमध्येही जनधन अकाऊंट सुरु करु शकतात. जर ग्राहकाच बचत अकाऊंट असल्यास त्यालाही जनधन खात्यामध्ये बदलता येऊ शकते. जनधन खातं कसं सुरु करायचं आणि बचत खातं जनधन खात्यात कशाप्रकारे बदलायचं या दोन्ही प्रक्रिया सोप्या आहेत. 

जनधन खातं सुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्र -

- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वोटर आयडी कार्ड
- पासपोर्ट
- मनरेगा जॉब कार्ड

कोणतंही बचत खातं जनधन खात्यात करण्यासाठी, बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर आपल्या खात्यासाठी  RuPay कार्डसाठी अर्ज करावा लागेल. फॉर्म बँकेत सबमिट केल्यानंतर बचत खातं जनधन खात्यात बदललं जाईल.

- जनधन खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याजाची सुविधा
- खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते
- जनधन खातेधारक आपल्या खात्यातून 10 हजार रुपयांचं ओवरड्राफ्ट करु शकतो. म्हणजे खात्यात पैसे नसतानाही 10 हजार रुपये काढता येऊ शकतात. परंतु ही सुविधा खातं सुरु केल्यानंतर काही महिन्यांनंतरच मिळते.
- या जनधन खात्याद्वारे निशुल्क दोन लाख रुपयांचा अपघाती विमादेखील मिळतो.
- यात 30 हजारांचाही विमा मिळू शकतो. खातेधारकाच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या नॉमिनीला ही रक्कम मिळू शकते.
- या खात्यात कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही.


ऑनलाइन डिजिटल सेवा व्याळा
स्टेट बँक ऑफ इंडिया
ग्रामपंचायतच्या समोर
९९७५८३९९७५



Comments

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

प्रधानमंत्री जन धन योजना सविस्तर माहिती,कागदपत्रे,फायदे,पात्रता,अर्ज प्रक्रिया

तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.