Labor Shramik Card : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी e-Shram कार्ड; जाणून घ्या काय आहेत याचे फायदे
देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी असून त्यांना आता या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरु आहे.
देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरु केलं आहे. विशेषत: कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.
बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरगुती कामगार आणि इतर अनेक कामगार हे आपली नोंदणी करू शकतात. यामध्ये नोंदणी केल्यानंतर, कामगारांना 12 अंकी नंबरचे लेबर कार्ड (Labor Card) दिले जाईल .त्या कार्ड वर त्या व्यक्तीचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती असे डिटेल असेल. या कार्डमुळे कामगारांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.
या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत एक वर्षासाठी अपघाती विमाही मिळेल. यासोबतच महामारीसारख्या काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कामगारांसाठी बऱ्याच सुविधा प्रदान करू शकतील. 26 ऑगस्टपासून या पोर्टलवर नोंदणी सुरू झालेली आहे.
ई-श्रम ( E-Shram) पोर्टलवर बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावर विक्रेते, घरगुती कामगार, दूधवाला, ट्रक चालक, मच्छीमार, कृषी कामगार आदि असंघटित कामगारांचा समावेश असेल.
जर एखाद्या कामगाराचे आधार कार्ड मोबाईलला कनेक्ट नसेल तर जवळच्या कम्युनिटी सर्व्हिस सेंटरला भेट द्या आणि बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. यानंतरही जर काही समस्या आली तर 14433 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर कॉल करुन आपल्या समस्येचं निवारण करता येईल.
ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे.
Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : Online Digital Seva.
(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)
संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४) <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )
Jalgaon (Maharashtra)
Call/Whatsapp Number: 9665735024.
Comments
Post a Comment