Posts

Showing posts from December, 2021

केंद्र सरकारची मुद्रा कर्जयोजना संपुर्ण माहिती

Image
  मुद्रा लोन , नविन व्यवसाय उभारणीसाठी केंद्र सरकारकडून मिळू शकते 10 लाखांची मदत  केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत  (PMMY)  कर्ज मिळते. आजकाल पैसाच्या अभावी अनेकजण बेरोजगार झालेले आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यात होणारी नुकसान अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा नव्या जोमाने व्यवसायात उतरायचे असेल तर केंद्र सरकारची एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. देशातील नागरिकांना आत्मनिर्भर करण्याच्यादृष्टीने मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी  किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत  (PMMY)  कर्ज मिळते. ज्या लोकांना बँकेतील जाचक अटींमुळे कर्ज मिळू शकत नाही, अशांसाठी ही (loan) योजना वरदान ठरण...

कोविड मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० हजार

Image
  कोविड मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० हजार सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिली. राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा  होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड-१९चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/-  इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात येणार आहे. हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपण...