केंद्र सरकारची मुद्रा कर्जयोजना संपुर्ण माहिती
मुद्रा लोन , नविन व्यवसाय उभारणीसाठी केंद्र सरकारकडून मिळू शकते 10 लाखांची मदत
केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (PMMY) कर्ज मिळते.
आजकाल पैसाच्या अभावी अनेकजण बेरोजगार झालेले आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यात होणारी नुकसान अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा नव्या जोमाने व्यवसायात उतरायचे असेल तर केंद्र सरकारची एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. देशातील नागरिकांना आत्मनिर्भर करण्याच्यादृष्टीने मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती.
केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (PMMY) कर्ज मिळते. ज्या लोकांना बँकेतील जाचक अटींमुळे कर्ज मिळू शकत नाही, अशांसाठी ही (loan) योजना वरदान ठरणारी आहे. तुमचा एखादा लघुद्योग असेल आणि तुमच्याकडे फक्त पार्टनरशिप डिड असेल तरीही पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तुम्हाला कर्ज दिले जाते.
तीन प्रकारचे कर्ज
पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तीन प्रकारेच कर्ज दिले जाते. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन और तरुण लोन अशा प्रकारांचा समावेश आहे. शिशु (loan) योजनेतंर्गत दुकान उघडण्यासाठी 50 हजारांचे कर्ज दिले जाते. तर किशोर लोन योजनेत 50 हजारापासून पाच लाखांपर्यंत कर्ज मिळते. तरुण लोन योजनेत 5 ते 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.
कोणाला मिळते कर्ज?
PMMY योजनेतंर्गत लहान व्यापारी आणि उद्योजकांना कर्ज मिळते. यामध्ये लहान कारखाने, दुकानदार, फळ किंवा भाजी विक्रेते, ट्रकचालक, रिपेअरिंगची दुकाने, लघुद्योग आणि फूड प्रोसेसिंग युनिट सुरु करण्यासाठी कर्ज मिळू शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील (PMMY) कर्जासाठी सरकारी बँका, ग्रामीण बँका, खासगी बँकांमध्ये अर्ज केला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने 27 सरकारी बँका, 17 खासगी बँका, 31 ग्रामीण बँका, 36 मायक्रोफायनान्स (loan) संस्था आणि 25 बिगरबँकिंग संस्थांना मुद्रा लोन वितरीत करण्याचा अधिकृत हक्क दिला आहे.
Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा :
Online Digital Seva.
(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)
संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४) <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )
Jalgaon (Maharashtra)
Call/Whatsapp Number: 9665735024.
JOIN WHATSAPP GROUP
माहिती आवडल्यास शेअर करायला विसरु नका धन्यवाद!
Comments
Post a Comment