IRDAI EXAM INSURANCE AGENT EXAM


IRDAI EXAM - 

विमा एजंट परीक्षा

विमा एजंट होऊन आपले भविष्य घडवणे ही खूप फायदेशीर संधी आहे. विमा योजनांच्या विक्रीचे कार्य आपल्या सोयीनुसार काम करून आपण जास्तीत जास्त कमिशन मिळवू शकता. परंतु एजंट होण्यासाठी आपणास एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. ती विमा एजंट परीक्षा आय.आर.डी.ए.आय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया) द्वारे आयोजित करण्यात येते. जर आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर आपणास विमा एजंट म्हणून काम करण्याचा परवाना मिळू शकतो.तर विमा एजंट परीक्षेबद्दलमाहिती जाणून घेऊयात-


विमा एजंट परीक्षेसाठी पात्रतेचे नियम खलीलप्रमाणे आहेत.

विमा एजंट होण्यास नोंदणी करण्यासाठी व परीक्षा देण्यासाठी आपणास काही अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अटी पूर्ण केल्यानंतरच केवळ आपणास विमा एजंट परवाना मिळविता येतो. अटी खालील प्रमाणे आहेत-
आपले वय किमान १८ वर्ष असावे.
आपण जर ग्रामीण भागातील असाल तर किमान वर्ग १०वी उत्तीर्ण व शहरी भागातील असाल तर किमान वर्ग १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एका विशिष्ट विमा कंपनी सोबतच आपणास नोंदणी करावी लागते.
विमा एजंट परीक्षा देण्यास पात्र होण्यापूर्वी आपणास आय.आर.डी.ए.आयने आयोजित प्रशिक्षण घ्यावे लागते.



परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे

विमा एजंट परीक्षाही ऑनलाईन स्वरूपाची असते. ही परीक्षा 50 गुणांची असून त्यामध्ये मल्टिपल चॉईस पद्धतीचे प्रश्न असतात.विमा एजंटचा परवाना मिळविण्यासाठी या परीक्षेत आपणास किमान 17 गुण मिळविणे अनिवार्य आहे.



विमा एजंट परीक्षेची तयारी करण्याबाबत माहिती

विमा एजंटच्या परीक्षेची तयारी अगदी सोपी असते. आय.आर.डी.ए.आयने आयोजित प्रमाणे अभ्यासक्रम असतो. अधिकृत संस्थां मार्फत प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे आपला परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करवून घेतला जातो. आपणास विमाचे मूळविषय, महत्वाच्या संकल्पना व विमा विषयी इतर सर्व ज्ञान मिळते. आय.आर.डी.ए.आयने आयोजित केलेल्या अभ्यासक्रमानुसार आपणास खालील गोष्टी शिकविल्या जातात-
विमाशी निगडित सर्व माहिती, त्याचे महत्वाचे मुद्दे, विमाची गरज, विमाचा उद्देश, इत्यादि.
विमाशी निगडित महत्वाचे शब्द जसे रिस्क, पेरील, हझार्ड, इ.
विमा बाजार व त्याची माध्यमे त्यासंदर्भात माहिती.
विमाचे सिद्धांत.
विक्री कशाप्रकारे करावी, इ.

जेव्हा आपण प्रशिक्षण व्यवस्थित रित्या पूर्ण करता, विमाच्या संकल्पना व त्याची माहिती योग्य व अचूक समजून घेता व आपण मिळविलेल्या ज्ञानामध्ये नैपुण्य मिळविता, तर आपल्या विमा एजंट परीक्षेची तयारी पूर्ण होऊन आपण सहजरित्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकता.



विमा एजंट परीक्षेचे महत्व जाणून घ्या

विमा विक्री करण्यापूर्वी आय.आर.डी.ए. (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी) ने प्रत्येक व्यक्तीस प्रमाणित असणे अनिवार्य केले आहे.

हे प्रमाणपत्र केवळ विमा एजंट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास प्राप्त होते.केवळ प्रशिक्षित व ज्ञानी एजंटनेच विमाची विक्री करावी त्यासाठी ही परीक्षा घेण्याचे मूळ कारण आहे.

विमा ही एक तांत्रिक संकल्पना असून ज्या व्यक्तीने विमा अभ्यासक्रमाचा अभ्यास केलेला आहे केवळ त्या व्यक्तीलाच विमाचे ज्ञान असू शकते.

विमा एजंट परीक्षे मार्फत विमा एजंटना विमा बद्दलचे नेमके किती ज्ञान आहे हे कळण्यास मदत होते. जे कोणी त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात, केवळ त्यांनाच विमाचा परवाना मिळविता येतो.

परवाना मिळविलेली व्यक्ती अचूकपणे अगदी योग्य त्या विमा योजनांची विक्री करू शकते कारण त्या व्यक्तीनेच विमाबद्दलचे योग्य ते ज्ञान मिळविलेले असते.


कमिशनची संरचना
तुम्ही आकर्षक विमा कमिशन कमवू शकता हे जाणणें महत्त्वाचे नाही, जो पर्यंत तुम्हाला वास्तविक आकडे माहीत नसतील. शेवटी, आकडेच स्पष्ट चित्र आकारतात, नाहीका? म्हणून, विभिन्न प्रकारच्या विमा पॉलिसी विकून तुम्ही कमवत असलेल्या कमिशन कडे पाहूया-

विमायोजनांचे प्रकारलागू असलेले कमिशन चे दर

मोटार विमा पॉलिसी (कार आणि बाइक दोघांचा विमा) खाजगी कार वर समावेशक विमा पॉलिसी- स्वतःची क्षती (ओडी) कव्हरसाठी घालून दिलेल्या प्रिमिअमवर 19.5% पर्यंत
व्यावसायिककारवर समावेशक विमा पॉलिसी- स्वतःची क्षती (ओडी) कव्हरसाठी घालून दिलेल्या प्रिमिअमवर 19.5% पर्यंत
दुचाकी वाहना वर समावेशक विमा पॉलिसी- स्वतःची क्षती(ओडी) कव्हर साठी घालून दिलेल्या प्रिमिअमवर 19.5% पर्यंत
प्रत्येक प्रकारच्या वाहनावर थर्ड पार्टी पॉलिसी– वार्षिक भरणा केलेल्या प्रिमिअम चे 2.5%
जीवन विमा पॉलिसी 30% पर्यंत वार्षिकी कृत प्रीमिअम- नियमित प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी
एकल प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी– एकल प्रिमिअमच्या 2% पर्यंत
टर्म लाइफ विमा पॉलिसी 30% पर्यंत वार्षिकी कृत प्रीमिअम- नियमित प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी
एकल प्रिमिअम भरणा पर्याय असलेल्या पॉलिसी– एकल प्रिमिअमच्या2%पर्यंत
आरोग्य विमा पॉलिसी वार्षिकी कृत प्रीमिअमच्या 15% पर्यंत

Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : 

Online Digital Seva.

(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)

संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४)   <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )

Jalgaon (Maharashtra)

Call/Whatsapp Number: 9665735024.

JOIN WHATSAPP GROUP 

Comments

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

प्रधानमंत्री जन धन योजना सविस्तर माहिती,कागदपत्रे,फायदे,पात्रता,अर्ज प्रक्रिया

तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.