तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.

तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने. अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईट वर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. येथे आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला ऑनलाईन सेवा यामध्ये ऑनलाइन रास्त भाव दुकाने हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. Ration Card Online Maharashtra आता ऑनलाइन रास्त भाव दुकाने यामध्ये दोन पर्याय दिसतील. त्यामधील AePDS – सर्व जिल्हे हा पर्याय निवडा. आता तुम्ही AePDS यांच्या वेबसाईटच्या पेजवर याल. येथे आल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला रिपोर्ट या विभागात RC Details हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला ज्या महिन्याचे रेशन तपासायचे आहे तो महिना आणि चालू वर्ष निवडा. त्यासोबतच तुमचा बारा अंकी SRC Number म्हणजेच रेशन कार्ड नंबर टाका. आणि सबमिट बटन वर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर या पेजवर तुम्हाला रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांची नावे दिसतील त्यासोबतच तुम्ही ठराविक महिन्यातील रेशन घेतले असेल तर तुम्हाला किती धान्य मिळाले आहे, यासंबंधीची सर्व माहिती दिसेल. Ration Card Online Maharashtra वरील सर्व माहिती तपासल्...