घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना 2024

 


घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना: घरगुती काम करणाऱ्या महिला / पुरुष हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी असते तसेच स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी असते. त्यामुळे ते अत्यंत कमी पगारात कोणाच्या तरी घरी धुणीभांडी, जेवण बनविणे, साफसफाई अशी घरकामे करतात. परंतु त्यांना तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करणे शक्य होत नाही त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. [घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

Kamgar Kalyan Yojana अंतर्गत देण्यात येणारे लाभ

जनश्री विमा योजना

घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिले जातात.

  • जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास 30,000/- रुपये देण्यात येतात.
  • अपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारस 75,000/- रुपये देण्यात येतात.
  • अपघातामुळे कायम स्वरुपी संपुर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास 75,000/- रुपये देण्यात येतात.
  • अपघातामुळे कायमस्वरूपी अशत: अपंगत्व आल्यास सभासदास 37,500/- रुपये देण्यात येतात.
  • याशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता 9वी ते 12वी करिता तसेच आय.टी.आय. चा कोर्स करीत असल्यास, दरवर्षी उर्त्तीण होत असल्यास, दर तिमाही करिता 300/- रुपये इतकी रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता ) देण्यात येते.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत एका जनश्री सदस्याचा वारसदारास नैसर्गिक मृत्यूबाबत 30,000/- रुपये इतकी रक्कम अदा करण्यात येते. [घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

अंत्यविधी सहाय्य

मृत घरेलू कामगाराच्या कायदेशिर वारसास अंत्यविधी सहाय्य 2,000/- रुपये देण्यात येते. त्यानुसार एक कुटुंबातील एकूण 2 सदस्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

कौशल्य विकास प्रशिक्षण

या योजनेअत्नर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्यांना शिकावू उमेदवार प्रशिक्षण व मॉड्यूलर एम्प्लॉएबल स्किम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. सदर योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणार आहे.

प्रसूती लाभ

या योजनेअंतर्गत घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्याअंतर्गत घरेलू कामगारास 2 अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता 5,000/- रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे. [घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

विदेशी भाषा प्रशिक्षण

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत विदेशी भाषा शिकविण्याचे वर्ग घेतले जातात. नोंदीत घरेलू कामगारांच्या पाल्यांना विदेशी भाषा शिकता यावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने त्यांना विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्यात येते व यावर होणारा खर्च घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात येतो.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत पदविका व पदवी अभ्यासक्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या मुला-मुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे 900/- रुपये व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी 650/- रुपये मंडळातर्फे देण्यात येतात. [घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

घरेलु कामगार योजना चे लाभार्थी

  • नोंदणीकृत घरकाम कामगार

Bandhkam Kalyan Yojana अंतर्गत कामगारांना होणार फायदा

  • या योजनेअंतर्गत घरकाम करणाऱ्या कामगारांचे जीवनमान सुधारेल.
  • घरकाम कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • घरकाम करणाऱ्या व्यक्तींना मुलांच्या उपचारासाठी, शिक्षणासाठी तसेच इतर गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. [घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

महिला कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

Gharelu Kamgar Yojana च्या अटी व शर्ती

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार घरगुती कामगार असणे आवश्यक आहे.
  • घरकाम करणारा व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत घरकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ घेत असता कामा नये.
  • अर्जदार व्यक्तीची घरकाम कामगार संघटनेमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. [घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

घरेलू कामगार योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचा तपशील
  • जेथे काम करत आहे तेथील मालकाचे संपूर्ण नाव व पत्ता

घरगुती कामगार कल्याण योजना अंतर्गत अर्ज कोठे करावा

  • आपल्या क्षेत्रातील जिल्हा सहाय्यक कामगार अधिकारी याच्या कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा. [घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र 

Online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा : 

Online Digital Seva.

(महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल.)

संपर्क: विशाल पंधारे (९६६५७३५०२४)   <- ( मोबईल नंबर वर क्लिक करा )

Jalgaon (Maharashtra)

Call/Whatsapp Number: 9665735024.

JOIN WHATSAPP GROUP 

Comments

Popular posts from this blog

ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे लागते ?

प्रधानमंत्री जन धन योजना सविस्तर माहिती,कागदपत्रे,फायदे,पात्रता,अर्ज प्रक्रिया

तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.