‘जनधन’चे फायदे

‘जनधन’चे फायदे दीर्घकालीन 'जनधन'चे काम कसे होते? शहरी भागांत वॉर्ड आणि ग्रामीण भागांत खेड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक त्या भागातील अन्य बँकांना कामाचा परिसर वाटून देते. त्यामुळे कुठल्या बँकेने कुठल्या परिसरातील कुटुंबापर्यंत पोहोचायचे हे निश्चित केले आहे. त्यानुसार गेले पाच महिने सरकारी बँका शहरांत-गावांत लोकांची 'झीरो बॅलन्स'ची जनधन खाती उघडत आहेत. बँकांच्या शाखांमध्ये खाते काढता येते. जिथे शाखा नाहीत तिथे बँकेचे 'बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) गावांमध्ये जाऊन कुटुंबातील एका सदस्याचे प्रामुख्याने महिलेचे खाते काढतात. आमच्या बँकेने महिला बचत गट, कॉर्पोरेट एजंटची (बीसी) मदत घेतली आहे. पहिला टप्पा २६ जानेवारीला पूर्ण करायचा आहे. सध्या सर्व्हेचेही काम सुरू असून तो पूर्ण झाला की नेमकी किती खाती काढणे बाकी आहे हे समजेल. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित खाती उघडली जातील. पूर्वीची 'झीरो बॅलन्स' खाती व 'जनधन'मध्ये फरक काय? बँकांसाठी 'झीरो बॅलन्स' हे प्रॉडक्ट आहे. आमच्या बँकेचे 'लोकबचत' नावाचेही झीरो बॅलन्स प्...